मुंबई : भलेही आज त्याची ओळख अंडरवर्ल्ड डॉन अशी झाली असेल. पण, प्रत्यक्षात हा मुंबई पोलिसांच्या भीतीने पाळालेला डरपोक गुन्हेगारच. दाऊद इब्राहिम असे त्याचे नाव. जो सध्या भलताच चिंतेत आहे. बंदूक आणि धाक जबरदस्तीच्या जोरावर अनेक चिंतांचा उतारा मिळवणारा हा गुन्हेगार सध्या हैराण आहे. ना बंदूक ना धाक कशाच्याच जोरावर त्याला या चिंतेवर उतार मिळवता येईना. त्यामुळे तो सतत डिप्रेशनमध्ये असतो.


दाऊदच्या मुलाने केला कुटूंबाचा त्याग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपला एकुलता एक मुलगा मोईन नवाज डी कास्कर (वय-31वर्षे)  आणि त्याचे सध्याचे कार्यक्षेत्र हे सध्या त्याच्या चिंतेचे कारण आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही माहिती पुढे आली आहे. मोईनने सध्या आपल्या घरादाराच त्याग केला असून, त्याने चक्क मौलाना बनण्याचे विचार पक्का केला आहे. 


दाऊदच्या कृत्यावर मुलगा नाराज


ठाण्यातील सक्तवसूली संचलनालय विभागाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 'मोईन आपल्या वडिलांच्या गुन्हेगारी वर्तुळाच्या विरोधात आहे. वडिलांच्या कृत्यामुळे संपूर्ण परिवार कुख्यात झाला आहे. तसेच, कूटांबाला प्रत्येक ठिकाणी परांगाच व्हावे लागले आहे.' शर्मा यांनी पुढे म्हटले आहे की, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याच्याकडे केलेल्या चौकशीत माहिती मिळाली आहे की, वडिलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कुटूंबावर ओढावलेली नामुष्की यामुळे मोईन नवाज डी कास्कर आतून खचला आहे. ठाणे पोलिसांच्या सक्तवसुली संचलनालयातील अधिकाऱ्यांनी इकबाल कासकर याच्यावर कारवाई केली. सप्टेबर महिन्यात झालेल्या या करवाईत त्याला विवित तिन प्रकरणात अटक करण्यात आली.


दाऊदला सतावतीय भविष्याची चिंता...


इकबाल कासकरने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितले की, दाऊदला कौटूंबिक हरवल्यामुळे चिंता सतावते आहे. आपण उभारलेले गुन्हेगारीचे इतके मोठे साम्राज्य भविष्यात कोण सांभाळेल याबाबत त्याला काळजी वाटत आहे. तसेच, वाढत्या वयासोबत त्याला प्रकृती अस्वास्थ्याचाही सामना करावा लागत आहे. त्यातच त्याच्या इतर भावांचाही मृत्यू झाला आहे. त्यामूळे आपले साम्राज्य सांभाळण्यासाठी विश्वासू आणि रक्ताचा व्यक्ती मिळत नसल्यामुळे तो सध्या हैराण आहे. दाऊदच्या मुलाने गेल्या काही वर्षांमध्ये कुटूंब आणि दाऊदचा व्यवसाय यांपासून व्यवहारीक पातळीवरून फारकत घेतली आहे. पण, या सर्वांपासून परत गेलेला तो पुन्हा दाऊदच्या व्यवसायाची कमान सांभाळणार का? हे मात्र, अद्याप समजू शकले नाही.


दाऊदचा मुलगा प्रतिष्ठीत मौलाना


दरम्यान, इकबाल कासकरने असेही म्हटले आहे की, त्याचा पुतण्या मोईन आता एक प्रचलीत आणि प्रतिष्ठीत मौलाना झाला आहे. मौलानाला 'हाफिज-ए-कुरान' असे म्हटले जाते. असा मान मिळणाऱ्या मौलानाला कुरान तोंडपाठ असते. कुरानमध्ये 6,236 छंद असतात. या शिवाय मोईनने कराचीत असलेले दाऊदच्या आलिशान घराचाही त्याग केला आहे. आता तो घराजवळ असलेल्या मशिदीत एका गरिब भिक्षूचे जीवन जगत आहे. आपले पुढील जीवन असेच व्यतीत करण्याचा त्याचा विचार आहे.


दरम्यान, त्याची पत्नी सानिया आणि त्याची तीन अल्पवयीन मुलेही त्याच्या सोबत असून, मशिदीमध्ये असलेल्या छोट्याशा घरातच ते राहतात.