राज्यात पाच वर्षात एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
महाराष्ट्र अवकाश आणि संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण-२०१८ जाहीर करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुंबई : महाराष्ट्र अवकाश आणि संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण-२०१८ जाहीर करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
१ लाख रोजगार
या धोरणानुसार राज्यात पाच वर्षात २०० कोटी डॉलर गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रातील सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना भांडवल उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत एक हजार कोटी रुपयांचा निधी उभा करण्यात येणार आहे.
विशेष निर्मितीस्थळे
संरक्षण धोरणांतर्गत राज्यात या क्षेत्राशी निगडीत पुणे, नागपूर, अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद या पाच ठिकाणी संरक्षण विषयक उत्पादनांची विशेष निर्मितीस्थळे स्थापन केले जातील.