विरोध झुगारून नाणार प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकार ठाम
एकीकडे नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध कायम असतांना सरकार मात्र हा प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे. नाणार प्रकल्पासंदर्भात मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या कार्यक्रमात सामंजस्य करार केला जाणार आहे.
मुंबई : एकीकडे नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध कायम असतांना सरकार मात्र हा प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे. नाणार प्रकल्पासंदर्भात मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या कार्यक्रमात सामंजस्य करार केला जाणार आहे.
गुंतवणुकदारांची शिखर परिषद
मुंबईत १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान एमएमआरडीएच्या मैदानात जागतिक गुंतवणुकदारांची शिखर परिषद राज्य सरकारनं आयोजित केली आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदमध्ये राज्यातील एमआयडीसी आणि केंद्राच्या तेल कंपन्यांमध्ये सुमारे दोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीबाबतचा सामंजस्य करार केला जाणार आहे.
विरोध असला तरी प्रकल्प होणार
राज्य सरकारच्या माध्यमातून होणारा केंद्र सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प कितीही विरोध असला तरी पुढे रेटला जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकल्पासाठी एमआयडीसी जागा उपलब्ध करुन देणार असून २०२२ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणं अपेक्षित आहे.