म्हाडा सोडतीसंदर्भात मोठी अपडेट; तुम्हीही अर्ज भरलाय का?
Mahada lottery 2023 : स्वत:चं घर असावं असं स्वप्न जवळपास प्रत्येकजण पाहतात. हेच स्वप्न साकार करण्यासाठी मग धडपड सुरु होते आणि अनेकांनाच मदत मिळते ती म्हणजे म्हाडाची.
Mahada lottery 2023 : मुंबई. अनेकांच्या स्वप्नांना बळ देणारी, अनेकांची स्वप्न पूर्ण करणारी, कोणाला आयुष्याच्या परमोच्च शिखरावर नेणारी आणि कोणासाठी आसरा असणारी मायानगरी. हे शहर अनेकाची कर्मभूमी. अशा या शहरात लहान का असेना, पण आपलं कुटुंब राहील इतकं तरी हक्काचं घर हवं, (Mumbai Real estate) अशी आस इथं नोकरी करणारा प्रत्येकजण मनी बाळगत असतो.
मागील काही वर्षांपासून या शहरात घरांचे दर गगनाला भिडले आहेत ही वस्तुस्थिती मात्र कोणीही नाकारत नाही. किंबहुना याच परिस्थितीमुळं काहींनी शहराबाहेर पडण्याचाही निर्णय घेतला. या साऱ्यामध्ये म्हाडानं मात्र घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना मोठी मदत केली. शहरातील विविध भागांमध्ये असणाऱ्या सोडतींच्या माध्यमातून म्हाडाकडून स्वत:च्या घरासाठी सर्वसामान्यांपुढे काही पर्याय खुले झाले. अर्थात काही दिवसांपूर्वीच म्हाडाच्या सोडतीसाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली.
तब्बल 4082 घरांच्या सोडतीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची अंतिम यादी सोमवारी प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं. पण, आता मात्र ही तारीख लांबणीवर पडली आहे. यादी प्रसिद्ध करण्यासाठी 28 जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी सोडतपूर्व टप्प्यासह मूळ सोडतीची तारीखही आता लांबणीवर पडली आहे.
हेसुद्धा वाचा : महारेरा कायद्यात मोठे बदल; घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनीच दिली दिलासादायक बातमी
आतापर्यंत या सोडतीसाठी 1.22 लाखांहून अधिकांनी अर्ज केला अशा सर्वांनाच आता सोडतीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. यावर म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून किंवा संबंधित यंत्रणेशी संलग्न कोणाकडूनही सोडतीच्या अधिकृत तारखेबद्दची माहिती देण्यात आलेली नाही.
कोणत्या भागातील घरांसाठी आहे, म्हाडाची सोडत?
अॅन्टॉप हिल, विक्रोळीतील कन्नमवार नगर सदनिका, पहाडी गोरेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची तरतूद अत्यल्प गटासाठी करण्यात आली आहे. तर, अल्प उत्पन्नगटातील अर्जदारांना लोकमान्य नगर दादर, अॅन्टॉप हिल वडाळा, डीएन नगर अंधेरी, पंत नगर घाटकोपर, चारकोप कांदिवली, जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड या भागांतील सदनिकांचे पर्याय खुले आहेत.
मध्यम उत्पन्न गटासाठी भायखळा, टिळकनगर चेंबुर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षा नगर सायन, चारकोपसह उयखळा, टिळकनगर चेंबुर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षा नगर सायन, चारकोप येथील सदनिका उपलब्ध आहेत. तर, उच्च उत्पन्न गटासाठी वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, तुंगा पवई आणि सायन पूर्ण येथील घरांचा पर्याय उपलब्ध आहे.