महारेरा कायद्यात मोठे बदल; घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनीच दिली दिलासादायक बातमी

Mahaera Act : अशाच शब्दांच्या गर्दीत होणारा एक उल्लेख म्हणजे, महारेरा. याच महारेरा संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मांडला.   

Jul 25, 2023, 08:28 AM IST

Mahaera Act : घर खरेदीचा विषय निघाला आणि घराचे व्यवहार दृष्टीक्षेपात आले, की काही शब्द हमखास कानावर येतात. कर्ज, गृहकर्ज, बँक, बिल्डर अशा एक ना अनेक शब्दांशी आपला संबंध येतो. 

1/7

Mahaera Act :

Deputy Chief Minister Devendra Fadnavis on Maharera Act

Mahaera Act : घर खरेदी करु इच्छिणाऱ्या सर्वांच्याच हितासाठी महारेरा कायदा केल्याचं सांगत या कायद्यामुळं अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आल्याचा मुद्दा फडणवीस आंनी विधानपरिषदेत अधोरेखित  केला.   

2/7

महारेरा क्रमांक

Deputy Chief Minister Devendra Fadnavis on Maharera Act

अनधिकृत इमारतींना ‘महारेरा’चे बनावट क्रमांक आढळून येण्याप्रकरणीच्या मुद्द्यावर ते बोलत होते. तर येत्या काळात ग्राहकांनाच केंद्रस्थानी ठेवत या कायद्यासह त्याच्या कार्यपद्धतीतही महत्त्वाचे बदल केले जातील असंही त्यांनी सांगितलं.   

3/7

महारेरा सक्रिय

Deputy Chief Minister Devendra Fadnavis on Maharera Act

दरम्यान, एकिकडे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून महारेरासंदर्भात लक्षवेधी वक्तव्य केलं जात असतानाच दुसरीकडे या संस्थेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईनं नजरा वळवल्या आहेत.   

4/7

नोटिस

Deputy Chief Minister Devendra Fadnavis on Maharera Act

राज्यातील जवळपास 197 बिल्डर्सना महारेरानं नुकत्याच नोटिस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईतीच 82 तर, पुण्यातील 86 बिल्डर्सचा समावेश आहे. नागपूरमधल 29 बिल्डर्सना महारेराची नोटीस गेली आहे.   

5/7

सुनावणी

Deputy Chief Minister Devendra Fadnavis on Maharera Act

या नोटिसनंतर पुढील कारवाईमध्ये जेव्हा सुनावणी पार पडली तेव्हा जवळपास 90 प्रकरणं निकाली निघाली.   

6/7

दंड

Deputy Chief Minister Devendra Fadnavis on Maharera Act

जिथं बिल्डरना महारेराकडून 10 हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला.   

7/7

जाहिरातबाजी...

Deputy Chief Minister Devendra Fadnavis on Maharera Act

काही डेव्हलपर्सनी महारेरा क्रमांक असूनही जाहीरातींवर तो मुद्रीत केला नव्हता किंवा ज्यांनी मुद्रीत केला तो अशा पद्धतीनं केला की अनेकांनाच दिसणार नाही. ज्यामुळं ही मंडळी महारेराच्या कचाट्यात सापडली होती.