Rajyasabha Election : राज्यसभेच्या सहा जागांसाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चुरस चांगलीच वाढली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. भाजपने तीन, शिवसेनेने दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक याप्रमाणे  उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये मतांसाठी 'कांटे की टक्कर' आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडीच जिंकणार, भाजप अपक्षांवर दबाव आणत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. पण चारही जागा जिंकण्याचा दावा संजय राऊत करत असेल तरी त्याआधीच मविआला धक्का बसला आहे.


बहुजन विकास आघाडीचा मविआला धक्का
राज्यसभा निवडणुकीसाठी हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी पार्टी भाजपाला पाठिंबा द्यायच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलीय. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. त्यामुळे आता मविआचं टेन्शन आणखी वाढलं आहे. पाठिंबा कुणाला द्यायचा ते पुढच्या काही दिवसांत ठरवू, असं बविआनं म्हटलंय. बविआ मविआलाच पाठिंबा देईल असा विश्वास काँग्रेसला आहे. 


सपाही मविआवर नाराज
दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पार्टीनं महाविकास आघाडीला धक्का दिलाय. आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून त्यात अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीत समाजवादी पार्टी तटस्थ राहण्याची शक्यता असून त्यामुळे मविआची 2 मतं घटण्याची शक्यता निर्माण झालीये. तर ही मतं आपल्याकडे वळवण्याची खटपट भाजपनं सुरू केली असून त्यामुळे मविआची धाकधुक वाढली आहे.


मविआचे सर्व आमदार हॉटेलमध्ये
राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवलं जाणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचं समजतंय. आमदारांना एकत्र ठेवून मतदानाची रंगीत तालीमही घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.