मुंबई : महाराष्ट्र विधानसबा निवडणूक २०१९ च्या निकालात २८८ मतदारसंघांपैंकी २४ मतदारसंघांनी आपला कौल एका महिलेला दिलाय. यंदाच्या विधानसभेत २४ महिला दाखल झाल्यात. यंदाच्या विधानसभेत भाजपाकडून १२, काँग्रेसकडून ५, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ३ तर शिवसेनेकडून केवळ २ महिला विधानसभेत दाखल झाल्यात. तर दोन महिलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विधानसभेत स्वत:साठी जागा मिळवलीय. यावेळी, विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षांकडून तब्बल २३५ महिला निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्राच्या इतिहासात महिलांच्या बाबतीत हा सर्वात मोठा आकडा आहे. परंतु, विधानसभेत महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या २८८ पैंकी केवळ २४ महिला म्हणजेच केवळ ८.३३ टक्के ... 


२०१४ सालच्या निवडणुकीनं २० महिलांना विधानसभेत संधी दिली होती तर २०११ साली केवळ ११ महिलांना विजय मिळाला होता. यंदा, महाराष्ट्रात मतदारांची एकूण संख्या ८.९७ करोड आहे. त्यात ४.३८ करोड महिलांचा समावेश आहे.  


यंदाच्या निवडणुकीत भाजपानं सर्वात जास्त म्हणजेच १७ महिलांना उमेदवारी दिली होती. यातील १२ जणींनी स्वत:ला सिद्ध केलंय. तर काँग्रेसनं १४ महिलांना संधी दिली होती. त्यातील पाच जणींनी विजय मिळवलाय. राष्ट्रवादीनं आठ महिलांना संधी दिली त्यातील तीन महिला यशस्वी ठरल्यात तर शिवसेनेनंही आठ महिलांना संधी दिली होती त्यातील केवळ दोन महिलांना यशाच्या आकड्यापर्यंत पोहचता आलंय. 


भाजपाच्या १२ महिला विजयी उमेदवार


विद्या ठाकूर, गोरेगाव


देवयानी फरांदे, नाशिक मध्य


मेघना बोर्डीकर, जिंतूर


भारती लव्हेकर, वर्सोवा


सीमा हिरे, नाशिक पश्चिम


मोनिका राजळे, शेवगाव


मुक्ता टिळक, कसबापेठ


श्वेता महाले, चिखली


मंदा म्हात्रे, बेलापूर


माधुरी मिसाळ, पर्वती


मनिषा चौधरी, दहिसर 


नमिता मुंदडा, केज


काँग्रेसच्या ५ महिला विजयी उमेदवार


यशोमती ठाकूर, तिवसा


प्रतिभा धानोरकर, वरोरा


वर्षा गायकवाड, धारावी


सुलभा खोडके, अमरावती


प्रणिती शिंदे, सोलापूर मध्य


राष्ट्रवादीच्या ३ महिला विजयी उमेदवार


सुमनताई आर आर पाटील, तासगाव - कवठेमहाकाळ


अदिती तटकरे, श्रीवर्धन


सरोज अहिरे, देवळाली


शिवसेनेच्या २ महिला विजयी उमेदवार


लता सोनावणे, चोपडा


यामिनी जाधव, भायखळा 


दोन अपक्ष विजयी उमेदवार


मंजुळा गावित, साक्री


गीता जैन, मीरा-भाईंदर (अपक्ष - भाजपा बंडखोर)