सुप्रिया सुळेंच `ते` भाकित खरं ठरलं
रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांचा पराभव केला आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत आलेल्या निकालांतून महाराष्ट्रातील चित्र जवळपास स्पष्ट झालंय. महायुतीला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. परंतु राष्ट्रवादीने या निवडणूकीत अनपेक्षित यश मिळवलं असल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणूक २०१९ मतदानापूर्वी सुप्रिया सुळे यांनी, भाजपाचे काही मंत्री अडचणीत असल्याचं भाजपाचा सर्व्हे सांगतो, असं त्यांनी सांगितलं होतं. सुप्रिया सुळेंचं हे भाकित खरं ठरलं आहे.
भाजपाच्या काही मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला आहे. रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांचा पराभव केला आहे. तर पंकजा मुंडे, अनिल बोंडे, यांचादेखील पराभव झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची कर्जतमध्ये सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी ६ मंत्र्यांचा पराभवाबाबत सांगितलं होतं.
काही मंत्री अडचणीत असल्यामुळे भाजपा चिंतेत आहे. आपलं पोरगं पास होणार का नापास? हे आईलाच माहिती असतं. आता भाजपचं म्हणतं माझं पोरगं नापास होणार. त्यामुळे रोहित पवारने आरामात बसलं पाहिजे. तुम्ही निवडून येतातच आहात. असं म्हणत त्यांनी रोहित पवारांच्या जागेसाठी विश्वास व्यक्त केला होता.