विधानसभा निवडणूक : ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने स्क्रिनिंग कमिटीची स्थापना केली आहे. अध्यक्ष म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांची नेमणूक करण्यात आल्याचे पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे या निवडीनंतर आता राज्यात काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सहा जणांची एक समिती नेमली आहे. या समितीची प्रमुख पदाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सोपविली आहे. या समितीत हरिश चौधरी, मनिकम टागोर हे सदस्य तर अखिल भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रटरी मलिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, नेते के. सी. पडवी यांचा समावेश आहे.