अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याचं आजपासून कामकाज
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे.
मुंबई : विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे.
शिवसेना मांडणार ठराव
प्रशांत परिचारक यांच्या सदस्यत्व निलंबनाबाबत शिवसेनेतर्फे विधानपरिषदमध्ये ठराव मांडण्यात येणार आहे. तेव्हा सदस्यत्व रद्द करण्याबाबत ठराव होतांना काय आरोपप्रत्यारोप होतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
राज्यपालांच्या भाषणावर चर्चा
विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात राज्यपालांच्या भाषणावर चर्चा असून विरोधकांनी केलेल्या टिकेबाबत मुख्यमंत्री काय उत्तर देतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसंच दोन्ही सभागृहात गारपीट आणि शेतकरी कर्जमाफी या विषयांवर विरोधीपक्षांनी चर्चा ठेवली असल्याने हा विषय गाजणार आहे.
नाणारवर प्रकल्पावर होणार चर्चा
विधानसभेत जनावरांचा लाळ खुरकूत रोग, द्राक्षचे दर या विषयांवर लक्षवेधी प्रश्नाद्वारे चर्चा होणार आहे. तर विधानपरिषदमध्ये वैद्यकीय उपकरणे आणि छापील किंमतीचा प्रश्न, राज्यातील गुटखा बंदी, डहाणू इथली बोट दुर्घटना, राज्यातील दुधाच्या दराचा प्रश्न, नाणार रिफायनरी प्रकल्प या विषयांवर लक्षवेधी प्रश्नांच्या मार्फत चर्चा अपेक्षित आहे.