Maharashtra Budget Session 2023: नागालँडमधील एनडीपीपी-भाजप (NDPP-BJP) आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा आश्चर्यजनक निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलाय. सत्तेसाठी भाजपच्या मांडीला मांडी लावण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. यावरुन आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुलाबराव पाटील यांचा टोला
नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिले, तिथे 50 खोके एकदम ओके झाले का? असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. 
बदलाचे वारे एकदम कसे वाहिला लागले आता 50 खोके  नागालॅंड ओके असं म्हणा असं गुलाबराव पाटील यांनी सुनावलं. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उत्तर दिलं. नागालॅंड इथली राजकीय परिस्थिती सगळे सरकार सहभागी होतात या आधी झाले. विनाकारण येथे का चर्चा असं अजित पवार यांनी म्हटलंय.


'आपलं ठेवायचं झाकून'
गुलाबराव पाटील यांनी विषय काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठोकून काढलं.  तुम्ही दररोज येऊन खोके खोके करता, आपण जेव्हा दुसऱ्यास बोटे दाखवतो त्यावेळेस आपल्याकडे बोटं असतात. बदलाचे वारे हेच का असे विचारले असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. तसंच आपल झाकाचं आणि दुसरे पाहायचे वाकून असा टोलाही लगावला. पवार साहेब बोलतात त्यावेळेस नेहमी उलटे झाले. कसबा हारली तरी भाजपाने तीन राज्य जिंकले. तुमचं काचंच घर आहे, आमच्यावर दगड मारताना विचार करावा असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.


नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा
नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप आघाडी (NDPP-BJP Alliance) सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँडमध्ये सात आमदार आहेत. या सर्व आमदारांचा एनडीपीपीप्रणित रियो यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचा आग्रह होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं या आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. हे सरकार रियो (Neiphiu Guolhoulie Rio) यांच्या नेतृत्वात एनडीपीपीचं आहे. त्यामुळे पाठिंबा दिला असल्याची भूमिका राष्ट्रावादीनं घेत भाजपपासून अंतर राखण्याचा प्रयत्न केलाय.