Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadanvis Government) मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर निघालाय. राजभवनात छोटेखानी समारंभात हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता शपथविधी होईल.  पहिल्या टप्प्यात 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाच्या मंत्र्यांची संभाव्य यादी झी २४ तासच्या हाती आलीय. पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील 10 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सकाळी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेणार आहेत. या बैठकीतच मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. 


शिंदे गटाची यादी तयार
दीपक केसरकर -  सिंदुधुर्ग
दादा भुसे  - मालेगाव
उदय सामंत - रत्नागिरी
अब्दुल सत्तार - संभाजीनगर
गुलाबराव पाटील - जळगाव
संदीपान भुमरे - संभाजीनगर
शंभुराज देसाई - सातारा 
संजय शिरसाट - संभाजीनगर
तानाजी सावंत - उस्मानाबाद
बच्चू कडू - अमरावती


भाजपच्या मंत्रिपदाची पाच नावंही निश्चित झाली आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात भाजपच्या पाच मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं समजतंय. 


भाजपकडून या नावांची शक्यता
चंद्रकांत पाटील - पुणे
सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर
गिरीष महाजन - जळगाव
राधाकृष्ण विखे पाटील - शिर्डी
सुरेश खाडे - सांगली


मंत्रिमंडळ विस्तारात गृह आणि अर्थ खातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडेच राहणार आहे. आधीच्या कार्यकाळातही गृहखातं फडणवीसांकडे होतं. त्यामुळे याहीवेळी गृहखातं त्यांच्याकडे राहिल, याशिवाय अर्थखातंही त्यांच्याकडे असेल. 


दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कोणतंही निमंत्रण मिळालेलं नाही. मात्र उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलीय.