Jalyukta Shivar Yojana : राज्यातील आताची मोठी बातमी. राज्यात जलयुक्त शिवार (Jalyukta Shivar) अभियान पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या (State Cabinet Meeting) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं जलयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) हे अभियान बंद करुन त्यांच्या कामाची चौकशी लावण्यात आली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde-Fadanvis Government) जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मविआ सरकारने बंद केली होती योजना
देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी असलेली जलयुक्त शिवार योजना मविआ सरकारने 2021 मध्ये बंद केली. जलयुक्त शिवार योजनेचं 71 टक्के काम पूर्ण झालं होतं, या कामात आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता असल्याचा आरोप मविआ सरकारने केला होता. या योजनेतंर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्याचा इशारा मविआ सरकारने दिला होता. 


आकसाने योजना बंद केल्याचा आरोप
मविआ सरकारने आकसाने जलयुक्त शिवार योजना बंद केल्याचा आरोप भाजपने केला. चौकशी समितीच्या अहवालात या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचं समोर आलं आहे, ही योजना योग्य पद्धतीने राबवली गेली असं भाजपने म्हटलंय. या योजनेत राबवण्यात आलीले कामं शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात आल्याचंही भाजपने सांगितलं. 


हे ही वाचा : 'शी त्यांच्यावर काय बोलायचं...' आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात संपवला नितेश राणेंचा विषय


काय आहे जलयुक्त शिवार योजना?
पावसाचं पाणी अडवून ते साठवून ठेवण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणं तसंच सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी आणि पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.