CM Eknath Shinde : गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय नाट्यमय घडामोडी आात रंगमंचावर पाहाता येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आयुष्यावर आधारीत नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकपात्री नाटकाद्वारे एकनाथ शिंदे यांच्या नाट्यमय राजकीय खेळीचा डाव उलगडला जाणार आहे. 'मला काही सांगायचंय' या नावाचं एकपात्री नाटक लवकरच रंगमंचावर येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या एकपात्री नाटकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय सांगणार याची जनतेला उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला काही तरी सांगायचंय या एकपात्री नाटकात मुख्य भूमिका अभिनेता संग्राम समेळ साकारणार आहे. येत्या दोन दिवसात नाटकाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या हे नाटक सेन्सॉर बोर्डाकडे असल्याची माहिती मिळतेय. ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार असल्यान शिंदे यांची राजकीय खेळी नेमकी कशी दाखवणार याची उत्सुकता आहे.


शिंदे वि. ठाकरे बंड रंगमंचावर


या नाटकाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात रंगलेलं शिंदे वि. ठाकरे बंड रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांसह सूरत गाठलं. तिथून गुवाहाटीला ते मुंबई असा प्रवास. त्यानंतर भाजपशी युती करत सत्ता स्थापन केली. अनपेक्षितरित्या मुख्यमंत्रीपदाची माळही शिंदेंच्या गळ्यात पडली. हा सर्व नाट्यमय प्रवास या नाटकात उलगडा जाणार आहे का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या नाटकाची निर्मिती प्रेरणा कला संस्था द्वारे करण्यात आली आहे. 'मला काही तरी सांगायचंय, एकनाथ संभाजी शिंदे' असं या नाटकाचं नाव आहे. या नाटकाचं पोस्टर समोर आलं आहे. 


याआधी मुख्यमंत्री शिंदे याच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली हे धर्मवीर या चित्रपटातून दाखवण्यात आलं होतं. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुक आनंद दिघे यांच्या जीवनपट या चित्रपटातून उलगडण्यात आलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं होतं. धर्मवीर आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु. या दोघांचं गुरु-शिष्याचं नातं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. आता धर्मीवर 2 चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली असून येत्या 27 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजकीय प्रवासावर आधारित चरित्रग्रंथाचं प्रकाशन झालं होतं.