मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नुकत्याच 'सेल्फी' वादात अडकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी १९ वर्षांच्या रिया राठोड हिला 'अलोम मिस मुंबई २००८'चा ताज घातला. यावेळी, मुलींनी दिवंगत प्रिन्सेस डायना यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असा सल्लाही मिसेस सीएमनं मुलींना दिलाय. जेईई अॅन्ड व्हीईई इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे आयोजित करण्यात आलेल्या 'अलोम मिस मुंबई २०१८' च्या दुसऱ्या भागात त्या पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सर्वांना एक छोटासा संदेश... मेकअप, कपडे आणि इतर गोष्टींवर तुमचा वेळ वाया घालवू नका. आंतर्बाह्य सुंदरता गरजेची आहे. परंतु आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन गरजेचा आहे. त्यामुळेच व्यक्ती उठून दिसतो... मला वाटतं आजच्या मुलींनी प्रिन्सेस डायनाकडून प्रेरणा घ्यावी. त्या नैसर्गिक सुंदरता आणि आत्मविश्वासाचं जिवंत उदाहरण होत्या' असं यावेळी त्यांनी म्हटलंय. 


या कार्यक्रमात नवी मुंबईची रहिवासी असलेल्या रियाला ग्रान्ड फिनालेची विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. या स्पर्धेत १५ जणांनी सहभाग घेतला होता.



'सेल्फी'चा वाद


मुंबई-गोवा क्रुझ पर्यटन सेवेचे शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी अमृता फडणवीस यांनी क्रुझच्या अगदी टोकावर जाऊन सेल्फी काढत होत्या. यामध्ये धोका असल्यामुळे अंगरक्षक आणि एका पोलीस अधिकाऱ्याने अमृता फडणवीस यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून अमृता फडणवीस यांनी सेल्फी काढण्याची हौस भागवून घेतली. साहजिकच यावरून वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर यावरून काही मजेशीर मिम्सही व्हायरल झाली होती.