मुंबई : राज्यासाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोनाने जून महिन्यात आतापर्यंतचा (Maharashtra Corona Update) उच्चांक गाठला आहे. तसेच मुंबईतील रुग्णसंख्येत असलेली वाढ कायम आहे. मृतांचा आकडा वाढला आहे. चिंता वाढवणारी बातमी म्हणजे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या 2 नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. (maharashtra corona update 14 june 2022 today 2 thousand 956 covid positive found in state and 2 new patients of new varient of b a 5 at thane)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 956 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना रुग्णांचा जून महिन्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. तर मुंबईत 1 हजार 724 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण 


राज्य सरकारची चिंता वाढवणारी आणखी एक बाब म्हणजे, राज्यात आज आणखी नवा व्हेरिएंट बीए.5 चे (B A.5) 2 रुग्ण आढळले आहेत. हे 2 जण ठाण्यातील आहेत.  


राज्यातील कोरोनाची दैनंदिन आकडेवारी 


सोमवार 13 जून : 1 हजार 885


रविवार 12 जून :  2 हजार 946   


शनिवार 11 जून : 2 हजार 922


शुक्रवार 10 जून  : 3 हजार 81 


गुरुवार 9 जून : 2 हजार 813 


बुधवार 8 जून :  2 हजार 701 


मंगळवार 7 जून : 1 हजार 881 


सोमवार 6 जून :  1 हजार 36  


रविवार 5 जून : 1 हजार 494


शनिवार 4 जून :  1 हजार 357


शुक्रवार 3 जून : 1 हजार 134 


गुरुवार 2 जून : 1 हजार 45


बुधवार 1 जून : 1 हजार 81