Maharashtra Corona Update | कोरोना रुग्णसंख्येत घट, ओमायक्रॉनचे किती रुग्ण?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) सातत्याने घट होत आहे.
मुंबई : राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) 'पॉझिटिव्ह' घट होत आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनासह ओमायक्रॉन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तर मृतांच्या संख्येत किंचीत वाढ झाली आहे. राज्यात शुक्रवारच्या तुलनेत आज 749 रुग्ण कमी आढळले आहेत. तर ओमायक्रॉनचे रुग्णही घटले आहेत. (maharashtra corona update 15 january 2022 today 42 thousand 462 corona and 125 omicron cases registered in state)
कोरोनासह ओमायक्रॉनचे किती रुग्ण?
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 42 हजार 462 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 125 ओमायक्रॉन पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा 43 हजार 211 इतका होता. तर ओमायक्रॉनचे 238 रुग्ण होते. तर 19 जणांचा मृत्यू झाला होता.
मुंबईची स्थिती काय?
मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 10 हजार 661 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात तब्बल 21 हजार 474 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 10 हजारांनी कमी झाली आहे.
आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 84 टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. तर फक्त 722 जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली आहे.