मुंबई : राज्यात कोरोनाचा (Maharashtra Corona Update) पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. राज्यात मंगळवारपर्यंत 3 हजारच्या आसपास असलेला कोरोनाने 4 हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. तसेच मुंबईतही पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. चिंताजनक बाब अशी की नव्या व्हेरिएंटचे 4 जण आढळले आहेत. तर 3 हजार 28 जण कोरोनामुक्त झाले आहेत. (maharashtra corona update 15 june 2022 today 4 thousand 24 positive patients found in state ba 5 varient 4 positive) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार  24 जणांना कोरानाने गाठलं आहे. तर मुंबईत 2 हजार 293 जणांना कोरोनाचं निदान झालं आहे. तर 2 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तसेच बीए 5 (BA 5 Varient) या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्णसंख्येसह नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सातत्यान आढळत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. 


सक्रीय रुग्णांमध्ये वाढ


दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होतेय. त्यानुसार आता सक्रीय म्हणजे कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडाही वाढतोय. राज्यात आजमितीस 19 हजार 261 जणांवर कोरोनाविरुद्ध उपचार सुरु आहेत.


जूनमध्ये असा वाढला कोरोना 


बुधवार 15 जून : 4 हजार 24


मंगळवार 14 जून : 2 हजार 956 


सोमवार 13 जून : 1 हजार 885


रविवार 12 जून :  2 हजार 946   


शनिवार 11 जून : 2 हजार 922


शुक्रवार 10 जून  : 3 हजार 81 


गुरुवार 9 जून : 2 हजार 813 


बुधवार 8 जून :  2 हजार 701 


मंगळवार 7 जून : 1 हजार 881 


सोमवार 6 जून :  1 हजार 36  


रविवार 5 जून : 1 हजार 494


शनिवार 4 जून :  1 हजार 357


शुक्रवार 3 जून : 1 हजार 134 


गुरुवार 2 जून : 1 हजार 45


बुधवार 1 जून : 1 हजार 81