Corona Update | मुंबईत कोरोनाचा उद्रेक, राज्यात रुग्णसंख्येत वाढ, ओमायक्रॉनचे रुग्ण किती?
मुंबईसह राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना (Maharashtra Corona Update ) आणि ओमायक्रॉनच्या (Omicrone Varient) रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
मुंबई : मुंबईसह राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना (Maharashtra Corona Update ) आणि ओमायक्रॉनच्या (Omicrone Varient) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात आणि मायानगरी मुंबईत (Mumbai) कोरोनाचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. (Maharashtra Corona Update 26th December 2021 1 thousand 648 patients of corona and 31 people were infected with Omicron variant)
राज्यात एकूण रुग्ण किती?
राज्यात 24 तासात 1 हजार 648 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ओमायक्रॉनचे एकूण 31 रुग्ण आढळले आहेत.
मुंबईचा आकडा चिंता वाढवणारा
धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा धोका वाढतोय.
मुंबईत गेल्या 12 दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. मुंबईत तब्बल 922 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 14 डिसेंबरला हाच कोरोना रुग्णांचा आकडा 225 इतका होता. राज्यात आता ताज्या आकडेवारीनुसार एकूण 141 सक्रीय रुग्ण आहेत.
हिवाळी अधिवेशनादरम्यान 32 जणांना कोरोना
मुंबईत विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान आतापर्यंत एकूण 32 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये पोलीस, सरकारी कर्मचारी आणि पत्रकारांचा समावेश आहे..
या वाढत्या धोक्यामुळे राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान 4 पेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाही. तसेच नियमावलीनुसार काही निर्बंधही लावण्यात आले आहेत.