मुंबई : शहरासह राज्यावर घोंगावत असलेल्या कोरोनाचा (Maharashtra Corona Update) धोका काही कमी होताना दिसत नाहीये. दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतेय. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 1 हजार 500 इतक्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चिंताजनक बाब म्हणजे मुंबईमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडाही वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यावर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. (maharashtra corona update 5 june today 1 thousand 494 patients found in state)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात आज  1 हजार 494 रुग्ण कोव्हिड पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर दुर्देवाने एकाचा मृच्यू झाला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला 614 जणांनी 24 तासांमध्ये कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 


मुंबईत सर्वाधिक रुग्ण


चितांजनक बाब अशी की मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्णांचं निदान झालंय. तर मुंबईत 961 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. 


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष


कोरोनाचा वाढता धोका पाहता सोमवारी राज्यमंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाचा वाढती संख्या आणि नियमावली यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत निर्बंधांबाबतही चर्चा होणार असल्याचं म्हटलं जातंय. 


...तर मास्कसक्ती अटळ 


मुंबईत कोरोना रुग्ण वाढल्यास मास्कसक्ती अटळ असल्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. कोरोना नियम न पाळल्यास कठोर निर्बंध लागतील, असाही इशारा अस्लम शेख यांनी दिलाय. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मास्क घालण्याचं आवाहन केलंय.