मुंबई : राज्यात आज (8 जानेवारी) पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 41 हजार 434 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोदं झाली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 133 जणांना ओमायक्रॉनची (Omicron) लागण झाली आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. (maharashtra corona update 8 january 2022 today 14 thousand 434 corona and 133 omicron patients found in state)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत किती रुग्ण?


मुंबईत गेल्या 24 तासात शुक्रवारच्या तुलनेत 653 कमी कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज 20 हजार 318 रुग्णांची नोंद झाली आहे. तर हाच आकडा शुक्रवारी 7 जानेवारीला 20 हजार 971 इतका होता.  


पुण्यात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण


राज्यात एकूण 133 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे या 133 पैकी 100 पेक्षा अधिक रुग्ण हे एकट्या पुण्यातील आहे. पुण्यात दिवसभरात 118 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.  


नवी नियमावली जाहीर


राज्यात कोरोनाचा वाढता कहर पाहता नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीची अंमलबजावणी ही 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे. आता राज्यात रात्री संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी असणार आहे.  


राज्यात रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे. तसंच सुधारित नियमावलीत शाळा, महाविद्यालय, हॉटेल, मॉल्स, शॉपिंग मॉल, मैदानं, क्रीडांगणांसाठी ही निर्बंध लावण्यात आले आहेत.


काय बंद असणार?


राज्यात मैदानं, पिकनिक स्पॉट, स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच  शाळा आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असतील.