अपॉईंटमेंट दिल्यानंतरही लसीकरण केंद्र बंद, लस नसल्यामुळे मुंबईकर नाराज
महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत कोरोनाच्या लसींची कमतरता आहे.
मुंबई : महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत कोरोनाच्या लसींची कमतरता आहे. त्यामुळे बीएमसीने लसीकरण केंद्र 4 दिवसांसाठी पूर्णपणे बंद केले आणि त्यानंतर मग 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठीही लसीकरण बंद केले होते आणि फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिल्या जात होत्या. त्यानंतर मंगळवारी, ज्या लोकांना दुसरा डोस घ्यायचा होता त्यांना लसीकरण सुरु केले आहे, त्याच बरोबर नवीन लोकांसाठी ही अपॉईंटमेंट दिल्या आहेत.
परंतु दहिसर लसीकरण केंद्रावर अपॉईंटमेंट दिल्यानंतरही केंद्र बंद करण्यात आले आहेत, ज्यामुळे लोकांना परत घरचा रस्त्याने परतावे लागले. त्या हॅस्पिटलमधील डीनचे म्हणणे आहे की, आमच्याकडे फक्त 100 लस आहेत आणि अशा परिस्थितीत हे केंद्र उघडले गेले तर, आपण सर्वांना लस देऊ शकणार नाही, म्हणून केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे लोकं खूप संतापली आहेत आणि केंद्रातील सुरक्षा कर्मचार्यांशी वाद घालत आहेत.
कारमध्ये बसून लस लावण्याची सुविधा
मुंबईतील दादर येथील कोहिनूर पार्किंगमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था केली गेली आहे. ज्याअंतर्गत अशा लोकांना गाडीमध्येच बसून लसीकरण करता येत आहे.
यासह सामान्य नागरिकांना येथे बसण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जे लोकं लस घेत आहेत त्यांना सुद्धा पुढच्या अर्ध्या तासाच्या निरीक्षणाच्या वेळी त्यांच्या गाडीत बसून राहता येईल. आरटी-पीसीआर दरम्यानही अशीच एक योजना राबविली गेली ज्याचा चांगला परिणाम झाला, त्यानंतर बीएमसीनेही अशा प्रकारे लसीकरण सुरू केले आहे.
महाराष्ट्रात 30 दिवसांत प्रथमच 50 हजारांहून कमी रुग्ण संख्या
महाराष्ट्रात सोमवारी नवीन कोरोना रुग्णांची संख्या 48 हजार 621 नोंदवली गेली, ज्यात राज्यात संक्रमित लोकांची संख्या वाढून 47 लाख 71 हजार 022 झाली आहे. त्यानंत 30 दिवसात पहिल्यांदा ही संख्या कमी होऊन 50 हजार पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
संसर्गाचे वाढते प्रकरण लक्षात घेता राज्य सरकारने 5 एप्रिलपासून लॉकडाउनसारखे निर्बंध घातले होते, त्यानंतर ते 15 मे पर्यंत वाढविण्यात आले आहेत. याचा फायदा आपल्या किती झाला हे, ही घटलेली रुग्ण संख्या पाहूण तुम्हाला कळेलच. त्यामुळे घरी रहा आणि गर्दीत जाणे, विनाकारण फिरणे टाळा.