मुंबई : राज्यात आज दोन हजार 336 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2 हजार 311 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे. 
 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दोन हजार 336 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 311 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78,69,591 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.97 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84% एवढा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 
राज्यात सध्या 14 हजार 599 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे आणि मुंबईमध्ये आहेत. पुण्यात चार हजार 967 तर मुंबईत एक हजार 865 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याशिवाय ठाणे एक हजार 16, नाशिक 688, अहमदनगर 460, सोलापूर 329 आआणि औरंगाबादमध्ये 314 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


दरम्यान आज सापडलेल्या रूग्णांइतक्याच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागासाठी ही दिलासादायक बाब आहे.