मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सतत वाढताना दिसतोय. महाराष्ट्रात 5218 कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 722 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत राज्यात 251 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


वर्धा, भंडारा, गडचिरोली, नांदेडमध्ये एकही कोरोनाबाधित आढळला नाही.


पाहा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आहेत - 


नंदुरबार 1
धुळे 4
नाशिक 95
जळगाव 3
औरंगाबाद 35
बुलढाणा 21
जालना 1
अकोला 16
वाशिम 1
अमरावती 6
नागपूर 79
गोंदिया 1
चंद्रपूर 2
यवतमाळ 16
हिंगोली 1
परभणी 1
बीड 1
अहमदनगर 29
पुणे 706
ठाणे 447
पालघर129
मुंबई 3451
रायगड 50
रत्नागिरी 8
सातारा 13
सोलापूर 25
उस्मानाबाद 3
लातूर 8
सांगली 26
कोल्हापूर 9
सिंधुदुर्ग 1


वाचा - कोरोना व्हायरस वुहान प्रयोगशाळेत तयार झाला; नोबेल विजेत्या वैज्ञानिकाचा धक्कादायक दावा


दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार ग्रीन, ऑरेंज आणि रेड असे झोन करण्यात आले आहेत. राज्यात ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन असले. तर १४ दिवसांमध्ये नवा एकही कोरोना रुग्ण वाढला नाही, अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन. २८ दिवस एकही नवा रुग्ण न आढळल्यास तो भाग ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.


देशात आतापर्यंत कोरोनाचे 19,885 रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 640 लोकांना मृत्यू झाला आहे. 3,870 जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. गेल्या 24 तासात 50 लोकांचा मृत्यू झाला आहे.