मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधले आहेत.कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाची ही साखळी मोडण्यासाठी मुख्मंत्र्यांनी कडक निर्बंध जाहीर केले आहेत. उद्या रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहणार मात्र त्या केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी चालू राहणार. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सार्वजनिक वाहतूक सुरू
कारण नसताना घराबाहेर पडल्यास कारवाई होणार
उद्या रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार 
लॉकडाऊन सदृश्य निर्बंध आहेत- उद्या रात्री ८ वाजल्यापासून अंमलबजावणी
- उद्या रात्रीपासून ब्रेक द चैनसाठी राज्यात संचारबंदी 
- पुढील १५ दिवस संचारबंदी
- येणे जाणे पूर्ण बंद
- आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडायचे नाही
- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद
- सार्वजनिक वाहतुक म्हणजे लोकल, बस व्यवस्था सुरू राहणार
- त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी वापरले जाणार
- वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतुक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार
- शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील
- बँका, आर्थिक संस्था,  अधिस्वीकृती धारक पत्रकार सुरू राहणार
- बांधकाम साईट सुरू राहणार, तिथे काम करणारे कर्मचार्‍यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट
हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार
- रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार
​ लाभार्थीना ३ किलो गहु आणि दोन किलो तांदुळ एक महिना मोफत
- सात कोटी लोकांना मोफत धान्य



राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, बाहेरील राज्यातून रस्त्याने ऑक्सिजन यायला वेळ लागतोय. लष्कराच्या मदतीने हवाई वाहतुकीने राज्यात ऑक्सिजन पुरवण्याची केंद्र सरकारला विनंती करणार - उद्धव ठाकरे