मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप - शिवसेना आणि मित्र पक्षांची महाआघाडी झाली आहे. मात्र, भाजप आणि शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली आहे. अनेक ज्येष्ठ नेते आणि काही मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची नाराजी आहे. तसेच अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज अधिकृत उमेदवाराच्या विरोधात दाखल केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची मोठी डोकेदुखी वाढली आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत भाजप आणि शिवसेनेकडून नाराजांची समजूत काढली जाईल. त्यांचे मन वळवले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजप आणि शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युतीची घोषणा झाल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी बंडखोरी झालेल्या उमेदवारांची समजूत काढण्यात येईल.  बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करु पण तरीही कोणी बंडखोरीवर ठाम असेल तर महायुती पूर्ण ताकदीने लढेल. तिकीट कापली म्हणणं योग्य नाही, जबाबदारी बदलली आहे. या निवडणुकीत महाघाडीचा मोठा विजय होईल. तसेच वरीळीतून आदित्य ठाकरे हे मोठ्या विक्रमी मताधिक्यांनी विजयी होतील, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.


भाजप - शिवसेना युती होईल का, अशी इतरांना शंखा होती. पण आमच्या मनात हा प्रश्न कधीच नव्हता. आम्ही लोकसभा एकत्र लढविली. आणि विधानसभा एकत्र लढविणार हे स्पष्ट होते. आम्हाला जोडणार हिंदुत्व एक समान धाना आहे.  एकत्र रहायचं असेल तर तडजोड करावी लागते, महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल, देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणालेत.