मुंबई :  विरोधी पक्षनेता आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी  उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. बाबरी प्रकरण, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि विविध मुद्द्यावंरुन जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस हे गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये उत्तर भारतीय युवा मोर्च्याच्या सभेत बोलत होते. या दरम्यान फडणवीस यांनी  2019 मध्ये अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबाबतही वक्तव्य केलं. (maharashtra former cm and lop devendra fadnavis comment over to morning Swearing in 23 november 2019 with ajit pawar)


फडणवीस पहाटेच्या शपथविधीबाबत काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सकाळचा शपथविधी यशस्वी झाला नाही हे बरं झाले. हा शपथविधी झाला असता तरी मंत्रिमंडळात वाझे नसता", असं फडणवीस म्हणाले.


शपथविधी टिकेवरून उपमुख्यमंत्र्यांनी फटकारलं


दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (15 मे) सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या टीकेवरुन विरोधकांना चांगलंच सुनावलं. 


"सकाळी 8 म्हणजे पहाटे 5 नाही. तुमची पहाट असेल तर धन्यचं", अशा शब्दात अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवरुन विरोधकांना फटकारलं.


राज्यात 2019 मध्ये राजकीय नाट्य पाहायला मिळालं होतं. राज्यात त्यावेळेस राजकीय भूकंप झाला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 23 नोव्हेंबर 2019 ला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती.