मुंबई : पोलीस दलात नोकरी करण्याचं स्वप्न उराशी बालगलेल्या (Maharashtra Police Recruitment 2022) तरुणांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. अखेर पोलीस शिपाई पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने पोलीस भरती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (maharashtra government has approved to fill state police recruitment 7 thousand 231 vacancies in the category)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहविभागाच्या या निर्णयानंतर आता तब्बल 7 हजारपेक्षा अधिक जागांसाठी भरती होणार आहे. राज्यात 7 हजार 231 जागांसाठी ही मेगाभरती असणार आहे. विशेष म्हणजे जिल्हानिहाय पोलीस भरती होणार आहे.  


महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमात सुधारणा 


या पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमात सुधारण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. शारिरक चाचणीत पास झालेल्या उमेदवारांनाच पुढे लेखी परीक्षेसाठी बोलावलं जाणार आहे.


एकूण इव्हेंट आणि गुणांचं वर्गीकरण 


पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणी (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) अशा पद्धतीने 50 गुणांची विभागणी करण्यात आली आहे. 


तर दुसऱ्या बाजूला महिला उमेदवारांना 800 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25 गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.


शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील. 


खालील विषयांवर लेखी परीक्षेतील प्रश्न 


लेखी परीक्षेत अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील.  तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटं असणार आहे. 


उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परीक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.