मुंबई : राज्यात एकूण 20 हजार जागांसाठी पोलीस शिपाई  (Maharashtra Police Recruitment) भरती होणार होती. त्यासाठी 1 नोव्हेंबरला जिल्हानिहाय जाहीरात प्रसिद्ध होणार होती. मात्र प्रशासकीय कारणांमुळे ही भरती तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती करण्यात आली. ही भरती 2021 ला होणं अपेक्षित होतं. मात्र त्यानंतरही 2022 मध्ये आता पुन्हा स्थगिती करण्यात आल्याने तरुणांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. भरती स्थगित करण्यात आल्याने इच्छूक तरुणांचं वयही वाढतंय. त्यामुळे शासकीय नोकरभरतीतील (Maharashtra Government Job) वयोमर्यादेच अट वाढवण्यात यावी, अशी मागणी इच्छूक तरुणांकडून करण्यात येत आहे. या मागणीची सरकार दरबारी दखल घेण्यात येणार असल्याचं समजत आहे. (maharashtra government may be increase age limit criteria in police and other government job recruitment)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पोलीस भरतीसह इतर शासकीय भरतीतील वयोमर्यादा वाढवण्यात येणार आहे. कोरोनामुळे राज्यात 2 वर्षे शासकीय नोकरभरती राबवता आली नव्हती. त्यामुळे राज्यातील लाखो तरूणांची वयोमर्यादा संपुष्टात आली होती. त्यामुळे आता पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा 2 ते 3 वर्षांनी वाढण्याची शक्यता आहे. याआधी कोरोना काळात एमपीएससीनं ही वयोमर्यादा वाढवली होती. 


मराठा समाजाचा विचार


मराठा आरक्षण रद्द झाल्यानं त्याचाही फटका भरतीला बसू नये, याची काळजी सरकारदरबारी घेतली जात असल्याचं म्हटलं जातंय. तसेच भरतीबाबत जातनिहाय फेरआढावा घेण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. सोबतच गरज पडल्यास अटी-शर्तींमध्येही बदल करण्याचा विचार सुरु असल्याचं समजतंय. गरज पडल्यास टप्प्याटप्प्यानेही भरती करण्यात येईल अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. जवळपास 14 हजार 956 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार होती. त्यामुळे आता या भरतीला पुन्हा केव्हा मुहुर्त मिळणार, याकडे राज्यातील इच्छूकांचं लक्ष असणार आहे.