आम्ही चिनी कंपन्यांसोबतचे करार रद्द केलेले नाहीत; राज्य सरकारचे स्पष्टीकरण
मॅग्नेटीक महाराष्ट्र 2 अंतर्गत राज्यातील उद्योग विभागाने 15 जून रोजी व्हिडोओ कॉन्फरसिंगद्वारे जगभरातील विविध कंपन्यांशी 16 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते.
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: मॅग्नेटक महाराष्ट्र २.० परिषदेत चिनी कंपन्यांसोबत झालेले करार राज्य सरकारने रद्द केलेले नाहीत. हे करार तुर्तास जैसे थे स्थितीत ठेवण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही त्यांनी सांगितले.
मॅग्नेटीक महाराष्ट्र 2 अंतर्गत राज्यातील उद्योग विभागाने 15 जून रोजी व्हिडोओ कॉन्फरसिंगद्वारे जगभरातील विविध कंपन्यांशी 16 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते. या 16 हजार कोटी रुपयांपैकी 5 हजार कोटी रुपयांचे करार तीन चीनच्या कंपन्यांशी करण्यात आले होते.
भारताची चीनला जोरदार धडक देण्याची तयारी, हे दिले सरकारने आदेश
हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3,770 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-2 पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. एकूण 5020 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.
चिनी उत्पादनांवर बंदी घालून काडीचाही फरक पडणार नाही- पी. चिदंबरम
चीन आणि भारताच्या सीमेवर 20 जवान शहीद होण्याच्या आधी हे करार करण्यात आले होते. मात्र, सीमेवर 20 जवान शहीद झाल्यानंतर चीनविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे चीनच्या कंपन्यांबरोबर केलेल्या या करारांचं काय करायचं याचा सल्ला राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागितला होता. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार चीनच्या कंपन्यांबरोबर करण्यात आलेले करार स्थगित करण्यात आले आहेत.