दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यासह कोरोनाचा ओसरता जोर पाहता निर्बंधही शिथिल करण्यात आले. राज्यात आता फक्त मंदिरं, सिनेमागृह आणि शाळाच बंद आहेत. लहान मुलांच्या जीवाशी कोणतीही तडजोड नको तसेच कोणताही धोका नको म्हणून अजूनही शाळा सुरु केलेल्या नाहीत. मात्र आता शाळा सुरु करण्यात यावी, अशा काहीशा प्रतिक्रिया या पालकवर्गातून येत आहेत. शाळा सुरु करण्यातबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुतोवाच केलंय. (maharashtra health minister rajesh tope reaction over to schools reopen in state)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजेश टोपे काय म्हणाले? 


शाळा सुरू करायचा पहिला टप्पा म्हणजे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे दोन्ही डोस पूर्ण करण्यात येणार. त्यासाठी 5 सप्टेंबरपर्यंत लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. तसेच यानंतर टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.