अनिल देशमुखांची गृह विभागाच्या अधिकाऱ्यांशी 3 तास चर्चा
गृहमंत्र्यांनी मीडियाचे प्रश्न टाळले
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी टाकलेला 'लेटर बॉम्ब' आणि 100 कोटी रुपयांची खंडणी केल्याच्या आरोपाने राज्याचे राजकारण तापले आहे. सोमवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख ((Anil Deshmukh)सरकारी निवासस्थान सोडले आणि सह्याद्री अतिथीगृहात पोहोचले.
यावेळी गृह विभागातील काही अधिकारीही त्यांच्यसोबत उपस्थित होते. अनिल देशमुख सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून रात्री ११ या वेळेत उपस्थित होते. त्यांनी गृहखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
मीडियाचे प्रश्न टाळले
सह्याद्री गेस्ट हाऊस येथे तीन तास मुक्कामाच्या वेळी अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काय माहिती घेतली, हे स्पष्ट झाले नाही. गेस्ट हाऊसमधून बाहेर पडताना अनिल देशमुख मीडियाचे प्रश्न टाळताना दिसले. यानंतर ते रात्री 11 नंतर ज्ञानेश्वरी येथील आपल्या शासकीय निवासस्थानी परतले.
राजीनाम्याची गरज नाही
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत त्यांच्या राजीनाम्याची गरज नाही असे पवार यांनी म्हटले आहे. परमबीर सिंह यांच्या पत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची पुन्हा मागणी केली आहे. याप्रकरणाची चौकशी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याकडून होणे अपेक्षित आहे.
अनिल देशमुख - सचिन वाझे यांच्यातील भेटीवरही पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी आयुक्तांनी केलेल्या आरोपामधील तारखांवेळी अनिल देशमुख कोव्हिड पॉझिटिव्ह असल्यामुळे क्वारंटाईन होते. त्यामुळे माजी आयुक्तांच्या आरोपात तथ्य नाही. असे पवार यांनी सांगितले.
फडणवीसांना टोला
गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी रुग्णालामध्ये दिलेल्या 'प्रेस बाईट'चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात 'मी पुन्हा येईन'चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचे प्रतीत होते आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल, असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.