मुंबई : 'तांडव'या ऍमेझॉन प्राईमच्या वेब सीरीजमुळे वाद निर्माण झाले आहेत. या वेब सीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्या असून उत्तर प्रदेश पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 'तांडव' विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. (Anil Deshmukh on Tandav Controversy) यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आमच्याकडे तांडव वेब सीरीजची तक्रार करण्यात आली आहे.  ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या कोणाचंही नियंत्रण नाही, त्यामुळे वाद निर्माण होत आहेत. नियमानुसार त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल मात्र आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने नियंत्रण आणण्यासाठी कायदा तयार करावा अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.



या वेह सीरीजला अनेक ठिकाणाहून विरोध झाला. अनेक पोलीस ठाण्यात या वेब सीरीजच्या निर्मात्या आणि कलाकाराविरोधात तक्रार नोंदवण्यात आल्या आहेत. यानंतर 'तांडव' च्या दिग्दर्शकांनी अली अब्बास जफर यांनी ट्विटरवर एक निवेदन जारी करून सर्वांची माफी मागितली आहे. अली अब्बास जफर यांनी या वेब सीरीजचे दोन मुख्य भाग असल्याचं म्हटलं आहे. पहिला भाग डिस्क्लेमर सारखा आहे. तो सीरीज सुरू होण्यापूर्वी दाखवलेला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.



दुसऱ्या भागात त्यांनी टीकेचा उल्लेख केला आहे. याच भागामुळे वाद निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही वेब सीरीज पाहिल्यानंतर ज्या कुणी आक्षेप घेतला आहे, त्या सर्वांची माफी मागत असल्याचं जफर यांनी म्हटलं आहे. तांडव रिलीज झाल्यानंतर आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवून होतो. या सीरीजवरून आमची माहिती आणि प्रसारण मंत्रालायशी चर्चा झाली. त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या सीरीजमुळे जनतेच्या भावना दुखावल्या असून त्यामुळे अनेक केसेस दाखल झाल्याचं आम्हाला सांगितलं.