Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk 2024: विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या धर्तीवर बरीच राजकीय खलबतं सुरू असून, आता या मतदान प्रक्रियेमध्ये घोडेबाजार होऊ नये या कारणास्तव पक्षांनी कमालीची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. मतांमध्ये फूट पडू नये यासाठी आमदार महोदयांना चक्क मुंबई शहरातील पंतारांकित हॉटेलांमध्ये वास्तव्याची सुविधा करून देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषदेतील 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार असून, यासाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.  


नेमके कोणत्या गटाचे आमदार कुठे थांबलेयत... पाहून घ्या.


भाजपकडून सर्व आमदारांच्या वास्तव्याची सोय मुंबईच्या कुलाबा येथील ताज प्रेसिंडेंट या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार या हॉटेलात एका रात्रीसाठी एका रुममागे साधारण 15 ते 20 हजार रुपये इतकी किंमत मोजावी लागते. 


हेसुद्धा वाचा : ...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका? 


अजित पवार गटानं आमदारांची सर्व व्यवस्था विमानतळ परिसरात असणाऱ्या द ललित या आलिशान हॉटेलमध्ये केली आहे. कमाल रचना आणि सुविधा असणाऱ्या या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी मोजावे लागतता 15 ते 20 हजार रुपये. 



शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल या कमाल हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. दक्षिण मध्य मुंबईमध्ये असणाऱ्या या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी जवळपास 12 ते 15 हजार रुपये इतकी किंमत मोजावी लागले असं म्हणतात. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार निवडणूक होईपर्यंत ताज लँड्स एंड इथं वास्तव्यास असतील असं सांगितलं जात आहे. सी व्ह्यू आणि इतर सर्वच सोयीसुविधा असणाऱ्या या हॉटेलमध्ये एका दिवसाच्या मुक्कामासाठी जवळपास 15 ते 25 हजार रुपये इतकी रक्कम मोजावी लागते.