मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाशी संबंधित परिस्थितीबद्दल पत्रकारांशी बोलताना मंगळवारी जाहीर केले की, ज्या लोकांना कोरोना झाला आहे, त्यांच्या मुलांची काळजी महानगरपालिका घेईल. लवकरच अशा मुलांसाठी पाळणा घर सुरू केले जाईल. पुढे त्या म्हणाल्या, लॉकडाऊनने खूप फायदा झाला आहे. यामुळे मुंबईतील परिस्थिती वेगाने सुधारली आहे. जेथे एका दिवसात 11 हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत होती, तेथे आता, ही संख्या 3 हजारांवर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की, "लोकांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने साथ दिली आहे, त्याच प्रकारे साथ द्या आणि महत्वाच्या कामासाठीच घर सोडा. अनावश्यकपणे घरा बाहेर पडू नका. घरीच राहा गर्दी करू नका आणि कोरोनाला हरवण्यात प्रशासनाला मदत करा."


लॅाकडाऊनमुळे ज्या लोकांचे खूप नुकसान झाले आहे. ज्यांच्या खाण्या- पिण्याचे हाल झाले आहे अशा लोकांची काळजी घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका मदतीचा हात पुढे करत आहे. नोंदणीकृत फोरीवाल्यांना सुद्धा मदत करण्याचे आश्वासन त्यांनी केले आहे.


59 केंद्रांमध्ये 45 वर्षांवरील लसीकरण सुरू


मुंबईतील प्रत्येकाला मोफत लसीकरण देण्याच्या विरोधकांच्या मागणीवर बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्ही मुंबईकरांना मोफत लस देण्याच्या बाजूने आहोत. परंतु प्रथम लस उपलब्ध करा आणि महापालिकेच्या प्रत्येक कामात विरोधकांनी अडथळा आणणे थांबवा.


ते पुढे त्या म्हणाल्या की, मुंबईतील 59 केंद्रांमध्ये 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. लस कमी असल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. दुसरी लस घेणारे लोकं लसीकरण केंद्रात जाऊन थेट लस घेऊ शकतात.


ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि बेघरांच्या लसीकरणासाठी योजना महापौर म्हणाल्या की, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि जैन भिक्षू लोकं तसेच जे बेघर आहेत त्यांचे देखील लसीकरण कसे केले जाईल यावर आम्ही विचार करणार आहोत. तसेच, दिव्यांग लोकांना घरी क्वारंटाईन ठेवले नाही जाऊ शकत, त्यांची काळजी घेण्याचा विचार देखील महापालिका करत आहे.


लसीकरण कमी होण्याचे कारण सांगत महापैर म्हणाल्या की, लसीची उपलब्धता वाढल्यास पालिका लसीकरणाला वेग येईल. अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणी करताना येणाऱ्या समस्यांवर बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना राज्यांना COWIN अ‍ॅपसारखे स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याचे आवाहन केले होते. ज्यामुळे रजिस्ट्रेशनी ची समस्या उद्भवणार नाही.