गणेश कवाडे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये (Maharashtra Police) भरती झालेल्या खेळाडूंना अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा , आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि नॅशनल क्रीडा स्पर्धांमध्ये मेडल मिळवल्यानंतर एक टप्पा पदोन्नती देण्यात येते. पण ही पदोन्नती 2014 पर्यंत देण्यात आलेली आहे.  2015 पासून मेडल (Medal) मिळवलेल्या खेळाडूंना दहा वर्षे उलटूनही पदोन्नती (Promotion) देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र पोलीस दलातील 200 पेक्षा अधिक खेळाडू पदोन्नती पासून वंचित आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 2008 ते 2014 पर्यंत अशाच प्रकारे पदोन्नती रोखण्यात आली होती. याप्रकरणात मॅट कोर्टात (Mat Court) याचिका दाखल केल्यानंतर मॅट कोर्टाने या खेळाडूंना पदोन्नती देण्याबाबतचे आदेश दिले होते.  यानंतर  2014 पर्यंतच्या खेळाडूंना मॅटकोर्टाच्या निर्णयानुसार पदोन्नती देण्यात आली. पण 2015 पासून ते 2023 दरम्यानच्या खेळाडूंना नॅशनल क्रीडा स्पर्धा (National sports competition) तसंच अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा यामध्ये पदक प्राप्त मिळूनही त्यांना प्रमोशन देण्यात आलेलं नाही. केरला ,राजस्थान, पंजाब,उत्तर प्रदेश ही राज्य त्यांच्या खेळाडूंना अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत  प्रमोशन देत आहेत. 


समाजाला तत्परतेने सेवा पुरवणारे पोलीस कठोर परिश्रम करून कर्तव्यांबरोबरोच क्रीडा क्षेत्रातही उत्तम कामगिरी करतात. पण त्यांना प्रमोशन मिळत नसल्याने महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडूंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. खेळामध्ये उत्तम कामगिरी करून महाराष्ट्र पोलीस दलाचं नाव उंचवण्याकरता केलेले परिश्रम वाया जातात की काय अशी भीती त्यांना सतावतेय. प्रमोशन मिळत नसतील तर खेळाडूंनी महाराष्ट्र पोलीस दलात भरती व्हावं की नाही असा प्रश्नही तरुणांना सतावतोय. खेळाडूला त्यांच्या होणाऱ्या डायटवर भरपूर खर्च करावा लागतोय.


सर्व जिल्ह्यातील घटप्रमुखांकडून खेळाडूंनी केलेल्या उत्तम कामगिरी बाबत प्रमोशन देण्याबाबतचे पत्र व्यवहार पोलीस महासंचालक कार्यालय आणि मंत्रालयांमध्ये करून सुद्धा अद्यापही पोलीस खेळाडूंना प्रमोशन देण्यात आलेलं नाही. 


मुंबई पोलिसांचा उपक्रम
दरम्यान, मुंबईमध्ये वाढत्या आत्महत्यांचे प्रमाण लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून आता विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. भांडुप मध्ये जागर अभियाना अंतर्गत ज्या भागांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन जनजागृती करत आहेत. भांडुपमध्ये पोलिसांकडून चौक सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधला जातोय. यासोबतच जे नागरिक मानसिक तणावाखाली आहेत त्या नागरिकांचे तज्ज्ञ कौन्सिलरच्या माध्यमातून समुपदेशन केलं जातंय. महिला आणि लहान मुलांमध्ये देखील आत्महत्यांचे प्रमाण वाढलेलं दिसून येत असल्यामुळे विशेष करून या चौकसभांसाठी महिलांना विशेष मार्गदर्शन केलं जातं आहे.