मुंबई : महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉनचं आयोजन मुंबई गेट वे ऑफ इंडिया इथं करण्यात आलंय. पोलीस मॅरेथॉनमध्ये जवळपास 17 हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला. देशविदेशातील खेळाडू देखील मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. पहाटे पाच वाजता सुरू झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत भारतातील धावपट्टूसह जागतिक कीर्तीचे धावपटू सहभागी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' मध्ये राज्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह आंतरराष्ट्रीय धावपटू आणि सामान्य नागरिक, अशा १७ हजार स्पर्धकांची नोंदणी झाली होती. मॅरेथॉनचे ४२, २१, १६ आणि ५ किलोमीटर असे चार टप्पे होते. 



आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना सुमारे ७५ लाख रुपयांची बक्षिसे देऊन गौरवण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी दिली.



ही मॅरेथॉन सकाळी 5 ते 9 या वेळेत झाली ‘तंदुरुस्त भारत-फिट इंडिया’ या चळवळीद्वारे पोलीस आणि सर्वसामान्य नागरीक यांच्यात शारिरीक तंदुरुस्तीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी अखिल भारतीय पोलीस महासंचालकांच्या परिषदेमध्ये ठराव करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रात या आंतरराष्ट्रीय दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडचे नियोजन विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश करीत आहेत.