जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्राच्या पोलीस दलाची वेबसाईट अजिबात अद्ययावत नाही, यात अनेक ठिकाणी माहिती अपडेट नाही, ही पोलीस दलासाठी न शोभणारी बाब आहे. एकीककडे सर्व विभाग स्मार्ट झाल्याचा दावा करत आहेत. यात गुन्हेगारी रोखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस दलाची वेबसाईट अपडेट नाही. ज्या महत्वाच्या विषयांची माहिती मिळाला हवी, त्यावर महाराष्ट्रातील संबंधित पोलीस स्टेशन्स माहिती अपलोड करत नसल्याचं चित्र आहे. हे पोलीस स्टेशन्स का माहिती अपलोड करत नाहीत, यासाठी कोणत्या तांत्रिक अडचणी येत आहेत. हे देखील समोर येणे गरजेचे आहे.


ऑनलाईन एकही एफआयआर कॉपी अपलोड नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली एफआयआर ऑनलाईन दिसली पाहिजे, पण कोणतीही एफआयआर ऑनलाईन दिसत नाही. डाऊनलोड हा पर्याय देखील दिसतो, पण यात एफआयआर कॉपी डाऊनलोड होत नाही. या बाबतीत संबंधित पोलीस स्टेशनकडून एफआयआर ऑनलाईन अपलोड करण्यास टाळाटाळ होते, किंवा त्या बाबत तांत्रिक अडचण येत आहे, हे पोलीस दलाने स्पष्ट करावे, आणि लवकरात लवकर एफआयआर ऑनलाईन दिसणे, डाऊनलोड होणे सुरू करणे गरजेचे आहे.


http://www.mhpolice.maharashtra.gov.in/Citizen/MH/PublishedFIRs.aspx


ई-गव्हर्नन्स कायद्यानुसार


ई-गव्हर्नन्स कायद्यानुसार, सरकारच्या प्रत्येक विभागाने आपली वेबसाईट अद्ययावत राखणे गरजेचे आहे. यावर सरकारचे कोट्यवधी रूपये खर्च झालेले आहेत. पण संबंधित विभागांकडून अनेक वेळा वेबसाईटवर माहिती अपडेट केली जात नाही. असंच असलं तर ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल इंडिया होणे कठीण आहे. माहितीच्या या युगात सरकारी विभागाची संपूर्ण माहिती ऑनलाईन असणे गरजेचे आहे.