नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि चिन्हाच्या मुद्यावर निवडणूक आयोगानं  (Election Commission) सुनावणी घ्यावी किंवा नाही यावर घटनापीठ सर्वात आधी सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगावरील स्थगिती उठणार का याकडे लक्ष लागलंय. तर दुसरीकडे घटनापीठाच्या सर्व सुनावण्या आता लाईव्ह पाहता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आजची सुनावणीही लाईव्ह होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर घटनापीठ निर्णय देणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची यावरुन राज्याच्या राजकारणात संघर्ष सुरु आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यात येणार असल्याची देखील शक्यता आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वेगळा गट बनवल्यानंतर आमदारांवर अपत्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे वर्ग केले होते. यावर आता आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.


आम्हीच शिवसेना असल्याचं शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाकडे पुरावे सादर करण्यास सांगितले होते.