Maharashtra Politics : शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या समर्थक आमदारांसह सध्या सूरतमध्ये आहेत. भाजपशी वाटाघाटी सुर असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांचा मुक्कात सूरतमधल्या मेरिडेयन हॉटेलमध्ये असून त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदार उपस्थित आहेत. तर आणखी काही आमदार मुंबईतून सुरतला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या असून सध्या या आमदारांना मुंबईतच रोखून धरले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर वर्षा निवासस्थानी हालचालींना वेग आला आहे. वर्षावर 33 हून अधिक आमदार हजर असल्याचा शिवसेनेने (ShivSena)दावा केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिवसेनेचे दोन नेते सूरतला रवाना झाले आहेत. मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत.


एकनाथ शिंदे दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार होते, पण आता ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. आता मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक एकनाथ शिंदे यांच्यासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव ठेवणार आहेत. हा प्रस्ताव एकनाथ शिंदे स्विकारणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 


एकनाथ शिंदे समर्थकांची भूमिका
या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. 


शरद पवार मुख्यमंत्री बैठक होणार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्ये संध्याकाळी 8ते 9 बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्या अगोदर शरद पवार राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत.