`... तर आदित्य ठाकरेंचे दौरे निघाले असते का? ` अमित ठाकरेंचा सवाल
सत्तासंघर्षात ठाकरे विरुद्ध ठाकरे! `तेजस ठाकरे राजकारणात आले....` पाहा काय म्हणाले अमित ठाकरे
मुंबई : एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे अजून मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप बाकी आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दिल्ली दौरे सुरू आहेत. याच दरम्यान अमित ठाकरे यांनी झी 24 तासशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली आहे.
एवढ्या राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर आदित्य ठाकरेंचे दौरे निघाले असते का असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारला आहे. तेजस ठाकरे यांचं राजकारणात स्वागत आहे असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. अमित ठाकरे आजपासून चार दिवसांच्या नाशिक दौ-यावर आहेत.
अमित ठाकरे काय म्हणाले?
खूप उत्तम प्रतिसाद आहे. कॉलेज पातळीवरचे प्रश्न मांडत आहेत. आम्ही सगळ्यांना भेटतो. सध्या पक्षबांधणीचं काम सुरू आहे. माझा फोकस कुठेही बदलला नाही. कोणतीही निवडणूक असो आपल्याला लढायची आणि जिंकायचीच आहे. तेजस ठाकरेचं स्वागत आहे असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.
कोविड कारणास्तव राज्यात दौरा करता आला नव्हता पण आता दौरा सुरू आहे तळागाळात जाऊन कार्यकर्त्यांना, लोकांना भेटणे सुरू आहे. सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना भेटणं सुरू आहे ते मनमोकळेपणाने बोलत आहेत. मुंबई कोकण ठाणे पालघर यानंतर आता नाशिक दौरा सुरू होत आहे.
आणखी दोन ते तीन महिने दौरा सुरू राहणार आहे. तरुणांचा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय त्यांच्या अडचणी त्यांचे शैक्षणिक प्रश्न ते मांडतात. आम्ही पहिल्यापासूनच लोकांना भेटत आहोत. सध्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्यावर माझा फोकस नाही मी विद्यार्थ्यांचे तरुणांचे प्रश्न कसे सोडवता येतील हेच पाहत आहोत.
या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू होण्यापूर्वीच माझा दौरा सुरू झाला होता. या राजकीय घडामोडी झाल्या नसत्या तर आदित्य ठाकरे यांनी दौरा केला असता का? तेजस ठाकरे राजकारणात आले तर स्वागत आहे. मी पण बातम्या वाचले पण त्या बातमी पुढे प्रश्नचिन्ह होतं.
जिथे निवडणुका लागतील तिथे जाणार घरोघरी फिरणार पक्षाचे काम घरोघरी पोहोचवणार. लीही निवडणूक असो ती लढायची आहे आणि जिंकायची आहे असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.