Maharahtra Shine Government : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं मुख्यमंत्रिपदासाठी नाव जाहीर केलं. यासोबतच फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचंही जाहीर केलं. यावरुन आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांनी जाहीर आणि खासगीत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारवी असा आग्रह केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या जनतेचा विकास या गोष्टींचा विचार करत देवेंद्र फडणवीस यानी हा निर्णय घेतला आहे. पण भाजपच्या केंद्रीय टीमने हे निश्चित केलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये यायला हवं आणि सरकारमध्ये पदभार स्विकारायला हवा. 


देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक आग्रह केला आहे. केंद्राने निर्देशित केलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा.  महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात असं जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे.