मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली. एकाएकी कोणाच्या ध्यानीमनी नसताना फडणवीस यांनी शिंदेंचं नाव जाहीर केल्याने सर्वांना एकच धक्काच बसला. शिंदे यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड होताच राज्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचं विविध स्तरातून अभिनंदनही केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही शिंदेंचं ट्विटद्वारे अभिनंदन केलंय. अभिनंदनासोबतच पवारांनी शिंदेंकडून एक अपेक्षाही व्यक्त केलीय. (maharashtra political crisis bjp national president j p nadda has requested to devendra fadnvis take charge of deputy chief minister)


पवारांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो", असं पवार यांनी ट्विटमध्ये नमूद केलंय.


तसेच "स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे", असंही राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी म्हटलंय.


थोड्याच वेळात शपथविधी


एकनाथ शिंदे हे आता थोड्याच वेळात संध्याकाळी राजभवनात राज्याचे 20 वे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याबाबतची माहिती फडणवीस यांनी दिली. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघे शपथ घेणार असल्याचं म्हटलं जात होतं.