Maharashtra Political Crisis : बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून जुंपण्याची चिन्हं
एकीकडे सत्ता (Maharashtra Political Crisis) कुणाची हा वाद रंगला असताना आता बाळासाहेब कुणाचे, हे नवं भांडण डोकं वर काढतंय.
मुंबई : एकीकडे सत्ता (Maharashtra Political Crisis) कुणाची हा वाद रंगला असताना आता बाळासाहेब कुणाचे, हे नवं भांडण डोकं वर काढतंय. मुख्यमंत्र्यांनी ठाकरे नाव न वापरता लढा, असं सांगितल्यावर शिंदे गटानं थेट बाळासाहेबांचंच (Balasaheb Thackeray) नाव आपल्या गटाला देण्याचा घाट घातलाय. (maharashtra political crisis eknath shinde rebel mla group vs shiv sena clashes over to whose balasaheb thackeray)
बाळासाहेबांचं नाव वापरण्यास शिवसेनेचा विरोध
शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गटानं आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळलाय. गटाला वेगळं नाव देण्याची वेळ आलीच, तर बाळासाहेब गट असं नाव दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी झी २४ तासला तशी माहिती दिलीये.
यावर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. बाळासाहेबांचं नाव वापरायला विरोध करत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. पक्षाच्या कार्यकारिणीमध्येही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव न वापरण्याची तंबी दिली.
हिंमत असेल तर स्वतःच्या बापाचं नाव सांगून मतं मागा. शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरेंचं नाव कुणालाही वापरू देणार नाही,
असं उद्धव ठाकरेंनी कार्यकारिणी बैठकीत खडसावलं.
याबाबत ऑनलाईन पत्रकार परिषदेत दीपक केसरकरांना विचारल्यावर त्यांनी उलट उद्धव ठाकरेंनाच टोला लगावला...
बंडखोर गटाचं नामकरण अद्याप झालेलं नाही. मात्र थेट बाळासाहेबांचंच नाव देत उद्धव ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. एकीकडे खरी शिवसेना कुणाची याची कायदेशीर लढाई लढतानाच आता माइंड गेमही सुरू झालाय... बंडखोर गटाला शिवसैनिकांच्या दैवताचं नाव देण्याची खेळी हा त्याचाच एक भाग आहे.