मुंबई :  शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष (Maharashtra Political Crisis) आता रस्त्यावर आलाय.  पुण्यात उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाकरे गट (Shiv Sena) विरुद्ध शिंदे गट (Eknath Shinde Group) यांच्यातला वाद आणखी चिघळलाय. शिवसेनेतली ही राडेबाजी कोणतं टोक गाठणार, पाहूयात हा रिपोर्ट. (maharashtra political crisis shiv sena and eknath shinde group clashes after uday samant van attack)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या रस्त्यावर मंगळवारी रात्री  राडा झाला. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी हल्ला केला.  विधानसभेत, संसदेत आणि सुप्रीम कोर्टात सुरू असलेला शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद आता राड्याच्या रूपानं रस्त्यावर आलाय. 



युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या सभेपासून अवघ्या काही अंतरावर हा हल्ला झाला. याप्रकरणी पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह चंदन साळुंखे, सुरज लोखंडे, संभाजी थोरवे आणि राजेश पासलकर अशा पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आलीय. 


गद्दारांच्या गाड्या फोड्या, असं चिथावणीखोर भाषण दोन दिवसांपूर्वीच हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी केलं होतं. त्यामुळं सामंतांवरील हल्ल्यानंतर बबन थोरात यांनाही अटक करण्यात आलीय... या सहाही जणांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.


चिथावणीखोर भाषा वापरणाऱ्यांवरही कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.  तर दुसरीकडं सामंतांच्या गाडीवरील हल्ल्याशी शिवसेनेचा संबंध नसल्याचा दावा नीलम गोऱ्हेंनी केलाय. 


एकनाथ शिंदे आणि आमदार-खासदारांच्या बंडानंतर ठाकरे समर्थक शिवसैनिक सैरभैर झाले होते. नेमकं काय होतंय, याबाबत शिवसैनिकांमध्ये संभ्रम होता. मात्र आता शिवसेनेत फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. 


फुटीनंतर बहुतांश आमदार-खासदार मंडळी शिंदेंसोबत गेल्यानं शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील दुसऱ्या फळीतील नेत्यांना आता आमदार-खासदार होण्याची आयती संधी उपलब्ध झालीय. 


त्यामुळंच ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय. मातोश्रीची मर्जी संपादन करण्यासाठी शिवसेनेतली ही राडे संस्कृती आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.