Sanjay Raut On Gautam Adani : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला असून, आता देशातील राजकीय पटलावर One Nation One Election च्या चर्चांनी जोर धरला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते संजय राऊत यांनी या योजनेवर सडकून टीका करत मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गौतम अदानी यांचा सहभाग पाहता, नेतेमंडळींसमवेत होणाऱ्या त्यांच्या भेटीगाठी आणि बैठकांवरही राऊतांनी जळजळीत शब्दांत टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तानाट्यामध्ये गौतम अदानी यांच्या भेटीगाठींवर आणि मध्यस्थीसाठीच्या कथित बैठकांवरही राऊतांनी कटाक्ष टाकला. 'गौतम अदानींच्या घरी अलिकडे राजकीय चर्चा होतात. महाराष्ट्राचं भविष्य ते ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं, धारावीसह अनेक एकर जमीन गिळली, ज्यांनी सत्ता येताच जकात नाके हातात घेतले हे गौतम अदानी. महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भविष्य ठरवणार आहेत ते अदानी काय आचार्य विनोबा भावे, धर्माधिकारी आहेत का? गौतम अदानी जमनलाल बजाज किंवा सन्माननीय यशवंतराव चव्हाण आहेत का?' असा थेट सवाल राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना केला.  


राजकारण्याचंय् गटातटांमध्ये मध्यस्ती करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न ते करत आहेत असं म्हणताना, एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे मित्र म्हणून महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करतोय तो या महाराष्ट्राचं भविष्य ठरवणार, इथं राजकारण करणार? आणि त्याच्यापुढे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतात त्यांनी स्वत:ला मराठी म्हणवून घेऊ नये अशा शब्दांत त्यांनी सणसणीत टीका केली.  


2029 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील का? 


एक राष्ट्र एक निवडणूक ही योजना 2029 पासून लागू करण्याच्या विचारात केंद्र सरकार असतानाच्या प्रश्नावर '2029 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील का?' असा खोचक प्रतिप्रश्न राऊतांनी विचारला. या देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उध्वस्त करण्याच्या मोदींच्या ज्या योजना आहेत त्यातलीच ही संकल्पना असल्याचं म्हणत त्यांनी 'वन नेशन वन इलेक्शन' ही त्यातलीच संकल्पना असल्याचं म्हणत निषेधाची भूमिका घेतली. 


हेसुद्धा वाचा : मुंबईत MHADA चं घर हवंय? 'या' भूखंडावर उभारली जाणार सामान्यांना परवडणारी 2500 घरं, कधी निघणार लॉटरी?


प्राण पणाला लावून मनपा निवडणूक लढू... 


मनपा निवडणुका कधीही लागूद्या, शिवसेनेनं मुंबईसह 14 मनपांच्या निवडणुकीची तयारी सुरु केलीय. आम्ही अत्यंत ताकदीनं निवडणुका लढवू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 'मुंबईसारख्या शहराला यांनी लोकनियुक्त सरकार, महापौर दिला नाही कारण त्यांना हरण्याची भीती वाटत होती. वाममार्गानं आम्ही विजय प्राप्त करून शकतो अशी खात्री पटल्यानंतर त्यांनी आता त्यांनी मनपा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबई ही मराठी माणसाची असून, ही महाराष्ट्रातच राहणार यासाठी आम्ही प्राणआची बाजी लावून निवडणूक लढवू', असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं.