Ashok Chavan Join BJP : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. अशोक चव्हाण यांनी बिनशर्त पक्षात प्रवेश केल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मात्र अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. असं करुन भाजप मोठी खेळणार आहे. दोन वर्षांपूर्वी भाजपने अतिरिक्त राज्यसभेची जागा जिंकली होती. तोच डाव पुन्हा एकदा टाकण्याची भाजपने तयारी केली आहे. अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश हा सुद्धा भाजपच्या याच योजनेचा एक भाग असल्याचे म्हटलं जात आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर जवळपास डझनभर आमदारही काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभा निवडणुकीत भाजप अशोक चव्हाण यांना तिकीट देणार असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश आणि राज्यसभा निवडणूक या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एकूण 6 पैकी 3 जागा भाजप जिंकण्याची शक्यता आहे आहे. त्यामुळे शिंदेंच्या सेनेला एक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळणार आहे. तर काँग्रेसकडे एक जागा जिंकू शकतो इतके संख्याबळ आहे. पण ही एक जागा देखील काँग्रेसच्या वाट्याला जाऊ नये ही भाजप आणि अशोक चव्हाण यांची योजना असल्याचे म्हटलं जात आहे.


राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्याची तारीख 15 फेब्रुवारी आहे. त्याआधीच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रेश केला आहे. सुरुवातीला अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित होणार असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आणि अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा एकाच ठिकाणी असणार आहे. त्यामुळे भाजपने आधीच चव्हाणांचा पक्षप्रवेश सोहळा उरकून घेतला. 15 फेब्रुवारीला अमित शाह अकोला दौऱ्यावर असणार आहेत.


राज्यसभेसाठी एकूण संख्याबळाचा विचार केला तर महाराष्ट्रात सध्या एकूण 285 आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीत उमेदवाराला विजयी होण्यासाठी 42 मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. उद्धव ठाकरे गटाकडे 16 आणि शरद पवार यांच्या पक्षाकडे 11 आमदार आहेत. दुसरीकडे एकट्या भाजपचे 104 आमदार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 39 तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे 44 आमदार आहेत.


त्यामुळे भाजपचा तीन जागांवर विजय निश्चित आहे. याशिवाय शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा जिंकू शकते. काँग्रेस आतापर्यंत स्वबळावर एक जागा मिळवू शकत होती. मात्र आता अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी भाजप आणखी एक उमेदवार उभा करू शकतो आणि अशोक चव्हाण यांना पाठिंबा देणाऱ्या  आमदारांचा पाठिंबा आपल्या बाजूने वळवू शकतो. जर असं झालं तर काँग्रसेच्या निवडणून येणाऱ्या उमेदवाराचा पराभव निश्चितच होऊ शकतो.