Maharashtra Politics : मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) लांबणीवर पडला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी (Winter Session) मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती मात्र आता मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्पयातील विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर होणार आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनातील कामकाज सोपं जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तात्पुरती सोय केली आहे. राज्यातील काही खात्यांचं वाटप काही काळापुरतं शिंदे गटातील मंत्र्यांनाच देण्यात आलंय. सध्या राज्यातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह 20 मंत्री आहेत. त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे अतिरिक्त खात्यांचा कारभार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे गटातील (Shinde Group) मंत्र्यांकडे नऊ तर भाजपच्या (BJP) मंत्र्यांकडे 9 खाती आहेत. शिंदे गटातील मंत्र्यांना अपेक्षेप्रमाणे खाती मिळाली नसल्याने त्यांच्यात नाराजी दिसून येतेय. तर अनेक इच्छुकांच्या पदरी मंत्रिपदच न मिळाल्यानेही बरीच धुसफूस आहे. पहिल्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये औरंगाबादचे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. 


19 डिसेंबरपासून हिंवाळी अधिवेशन
महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये पार पडणार आहे. कोरोना संकट आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddha Thackeray) यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे मविआ (Mahavikas Aghadi) काळात हिवाळी अधिवेशन नागपूर अधिवेशन नागूपरात (Nagpur) झालं नव्हतं. त्यामुळे आता दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. 


विधान परिषद सभापतीपदाची निवड
दरम्यान, येत्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्र विधान परिषदेचं सभापतीपद रिक्त आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आहेत. त्यामुळे सभापतीपद आपल्याकडे यावं यासाठी भाजपचा प्रयत्न असेल. भाजपकजून राम शिंदे (Ram Shinde) यांच्या नावाची चर्चा आहे.


विधान परिषदेत 21 जागा रिक्त आहेत, यापैकी राज्यपाल नियुक्त कोट्यातून 12 जागा तर शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा जागा जागा रिक्त आहे.