Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray)  असणारे उरले-सुरलेले शिलेदारही शिंदे गटात (Shinde Group) जाणार अशा चर्चा सुरु झाल्यात. ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशा चर्चांना उधाण आलंय. आता या चर्चा का सुरु झाल्यात तेही ऐका.. शिंदे गटाचे 13 खासदार निवडून येणार नाहीत असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला.. त्यावर शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे (Krupal Tumane) यांनी प्रत्युत्तर देताना मोठा गौप्यस्फोट केलाय.. ठाकरे गटाचे काही आमदार आणि खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील असा गौप्यस्फोट तुमाणेंनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरे गटाकडे किती आमदार आणि खासदार आहेत पाहुयात.. 



ठाकरेंसोबत कोणते आमदार 







 
शिंदे गटाच्या वाटेवर?
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाचा ताबा शिंदे गटाकडे आहे. 40 आमदार आणि 12 खासदार ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेले.. ठाकरेंसोबत केवळ 5 खासदार आणि 16 आमदार उरलेत. आता त्यापैकीही काही आमदार-खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट शिंदेंच्या खासदारानं केलाय. त्यामुळे ठाकरेंसोबतच्या आमदार-खासदारांमध्ये पुन्हा फूट पडणार का, शिंदे गटाच्या संपर्कात असणारे आमदार, खासदार कोण.. याची चर्चा सुरु झालीय.


आंबेडकरांच्या भूमिकेमुळे आघाडीत वंचित बिघाडी?
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) स्फोटक विधानांमुळे मविआत कलगीतुरा सुरु झालाय. मविआच्या नादी लागू नका नाहीतर तुमचा राजकीय बळी जाईल असा सल्ला आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिलाय तर सध्याच्या ईडीच्या राजकारणात सर्वात कमकुवत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर इतक्यावरच थांबले नाहीत तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची वक्तव्य म्हणजे इंग्रजी चित्रपट हॉट अँड ब्लोप्रमाणे कधी गरम तर कधी नरम हवा निर्माण करणारी आहेत असा घणाघातही त्यांनी केलाय.. 


ठाकरे-आंबेडकर युती
दलित आणि मुस्लिम मतं ही प्रकाश आंबेडकरांची ताकद मानली जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांची टक्केवारी लक्षणीय होती. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे-आंबेडकर युती झाली. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकरांच अजून काहीच ठरताना दिसत नाहीये. बोलणीप्रक्रिया राहिली दूर.. टोकाच्या भूमिका आणि स्फोटक विधानांमुळे आंबेडकरांच्या मविआतल्या एंट्रीआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बिनसताना दितंय. यात तारेवरची कसरत ठाकरे गटाची होताना दिसतेय. आंबेडकरांना सांभाळायचं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीलाही दुखवायचं नाही असा पेच ठाकरेंसमोर आहे. एंकदरीतच वंचितची एंट्री मविआत खोडा घालणारी ठरतेय.