Uddhav Thackeray Live : लोकशाहीचे चार स्तंभ आहेत असं आपण मानतो, या चारही स्तंभांनी आता लोकशाही वाचवायला पुढे यायला हवं, लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे. लोकशाही कोसळली तर या स्तंभाला काहीही अर्थ राहाणार नाही असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाचं संख्याबळ जास्त असूनही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला. 


आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्धत आहे, मतदान कोणी कोणाला केलं हे गुप्त राहातं, पण निदान ज्याने मतदान केलं आहे त्याला तरी कळलं पाहिजे कोणाला मतदान केलं. त्या गुप्त मतदानाची अशी वाटचाल व्हायला लागली,  तर मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 


आम्ही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं, मतदाराने टाकलेलं मत हे जर व्हाया सुरत, व्हाया गुवाहाटी, व्हाया गोवा असं जर का फिरायला लागलं, आणि जर त्या मतदारालाच कळलं नाही की आपलं मत कुठून कुठे फिरतंय, तर लोकशाही आहे कुठे आपल्या देशात. 


75 वर्ष आपल्या देशाला झाली, लोकशाहीला झाली, पण 75 वर्षात लोकशाहीचे काय धिंडवडे निघाले आहेत, हे धिंडवडे आता थांबवण्याची गरज आहे. लोकशाहीत सर्वोच्च असलेल्या मतदाराचा बाजार अशा पद्धतीने मांडला जात असेल तर ते देशाच्या दृष्टीने घातक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.